Sunday, 30 July 2023

तुझी भूमिका, तुझा न्याय, तुझ कर्तव्य

 


कर्तव्याला न्याय दिलास तरच सुखाची झोप येईल,

नाहीतर आतल्या आत काहीतरी खात राहील.


बोलून शब्द पाळला नाहीस, तर शब्दांना किंमत उरणार नाही, अर्थ उरणार नाही.


कुणाला कळो वा ना कळो , तुझ मनच तुझा न्यायनिवाडा करतच राहील आतल्या आत, तुझी मर्जी असो वा नसो.


देनाऱ्याकडे द्यायला भरपूर आहे, पण तुझी झोळी नीट आहे ना, तिच्याकडे पण एकदा नजर टाक.


तुझी माणुसकीची झोळी , स्वतःशी प्रामाणिक राहण्याची झोळी, कर्तव्याची झोळी फाटली तर नाही ना कुठे.


फाटली असेल तर शिव तिला, वेळ कधीही गेलेली नसते, हीच ती वेळ .


शिवत रहा शिवत रहा जो पर्यंत तुझच मंन न्यायनिवाडा करून तुला सांगत नाही.. शिवत रहा.


मोठं- छोट, हार-जीत, सन्मान-अपमान, हुशारी-मूर्खपणा ई ई comes and goes, comes and goes, comes and goes..


मूर्खाच्या शब्दांना कधी किंमत येईल आणि शहान्याचा सुज्ञपणा कधी चिखलात जाईल,हे दिसेल तुला पण डोळे उघडे ठेवलेस तर.


बदलतंय सगळं, प्रकृतीचा नियम, Change is permanent.


क्षणभंगुर क्षणभंगुर क्षणभंगुर

जीवन क्षणभंगुर, त्यातल्या व्यक्ती वस्तू परिस्थिती क्षणभंगुर.

भावना,विचार, माया, प्रेम, दोस्ती क्षणभंगुर क्षणभंगुर क्षणभंगुर.

Monday, 6 March 2023

छत्रपती शिवाजी महाराज आमचे.....

 


छत्रपती शिवाजी महाराज आमचे आहेत आणि रामदास स्वामी तुमचे आहेत

महात्मा फुले आमचे आहेत आणि बाळूमामा तुमचे आहेत

अहिल्याबाई आमच्या आहेत आणि सावतामाळी तुमचे आहेत

बहिणाबाई आमच्या आहेत आणि  मुक्ताई तुमची आहे

तुकाराम महाराज आमचे आहेत आणि ज्ञानदेव तुमचे आहेत
 
आंबेडकर तुमचे आहेत आणि महावीर आमचे आहेत

माझा झेंडा ह्या रंगाचा आहे आणि तुझा झेंडा त्या रंगाचा आहे.
आपण सगळे महापुरुष आधीच वाटून घेतले आहेत. 

ह्या महापुरुषाने आमच्या जातीत जन्म घेतला म्हणून हा महापुरुष फक्त आमचा आहे, त्याच्यावर आधी आमचा हक्क आहे, तो सगळ्यांचा नाहीये, तो फक्त आमचा आहे . 

कारण ह्या आमच्या महापुरुषाने आम्हाला शिकवल आहे की आयुष्य जगत असताना प्रत्येक गोष्टीकडे जातीच्या चष्म्यातूनच बघावं, तेव्हाच आपलं कल्याण होईल, समाजाच कल्याण होईल आणि आपला देश असाच पुढे पुढे जात राहील....

- सुदर्शन जायभाय 







तुझी भूमिका, तुझा न्याय, तुझ कर्तव्य

  कर्तव्याला न्याय दिलास तरच सुखाची झोप येईल, नाहीतर आतल्या आत काहीतरी खात राहील. बोलून शब्द पाळला नाहीस, तर शब्दांना किंमत उरणार नाही, अर्थ...